नस्तनपूर क्षेत्रात देवादिकांचे वास्तव्य

अशा पावन तीर्थ क्षेत्री प्रभू रामचंद्राप्रमाणेच राजा नलदमयंती, राधाकृष्ण, पांडव, द्रौपदी, राजा विक्रम, नवनाथ, दत्तगुरू, शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, छ.शिवाजी महाराज, संत जनार्दन स्वामी महाराज आदींनी शनि महाराजांची या ठिकाणी सेवा केल्याचे सांगतात.

पुणे येथील प्रसिध्द ज्योतिषी दामोदर शास्त्री दाते यांनी लिहिलेल्या ‘शनि –मारुती उपासना’ या पुस्तकात पुढील मजकूर आहे.

ज्यांना साडेसातीचा त्रास होतो त्यांनी नस्तनपूर येथे शनिच्या या जागृत स्थानावर जाऊन शनिची पूजा व उपासना केल्यास साडेसातीचा त्रास दूर होतो व शनि पिडा नाहीशी होते. राज ज्योतिषी भास्कराचार्य ह्यांना भ्रम झाला होता तेव्हा त्यांच्या कन्येने त्यांना नस्तनपूर या ठिकाणी आणून शनिची सेवा केली त्यामुळे शनिमहाराज प्रसन्न होऊन त्यांनी भास्कराचार्यांना बरे केले एवढेच नव्हे तर ‘लिलावती’ नावाचा ज्योतिषशास्त्रावरील महान ग्रंथ या ठिकाणी सिद्ध झाला आहे.